Wednesday, June 26, 2019

In 'Rokhthok' A Book by Ameet Satam, He discusses the Mumbai's Open Space and House Development Problem


On the start of this month, BJP’s MLA of Andheri West Ameet Satam launched his book ‘Rokhthok’. It is a compilation of all the speeches he has given in Legislative Assembly of Maharashtra. This is the third speech in this book.प्रथम अर्थसंकल्पिय अधिवेशन, मुंबई
विषय : म.वि.स. नियम २९३ अन्वये मुंबईतील विविध समस्येच्या संदर्भातील चर्चा
मोकळ्या जागा व गृहनिर्माण
श्री अमीत साटम

अध्यक्ष महोदय, म.वि.स. नियम २९३ अन्वये मुंबईतील विविध समस्येच्या संदर्भातील जो प्रस्ताव चर्चेसाठी आणलेला आहे. यावर माझे विचार व्यक्‍त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे.

अध्यक्ष महोदय, प्रस्तावाची सुरुवात ही वाहतुकीच्या समस्येपासुन झालेली आहे. मुंबई शहरात दरदिवशी ५०० नवीन वाहने रस्त्यावरुन धावत आहेत. मुंबईतील १३ टक्के लोक गाडीने प्रवास करीत आहेत. यावरुन पब्लिक ट्रान्सपोर्टची किती आवश्यकता आहे, हे दिसून येत आहे. त्यामुळे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरातील कोस्टल रोड आणि मेट्रो ३ च्या प्रकल्पास गति देण्याची आवश्यकता आहे. येत्या तीन ते चार वर्षात मुंबई शहरातील कोस्टल रोड आणि मेट्रो ३ चा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे
अभिनंदन करणार आहे. कोस्टल रोड आणि मेट्रो-३ प्रमाणे मेट्रो २ ट्रान्स हार्बर, सी-लींक हाजीअली टू वरळी सी-्लीक आणि बी.आर.टी.एस.चा प्रश्‍न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.

अध्यक्ष महोदय, मुंबईतील, मोकळ्या जागेंच्या संदर्भात मी ब्रोलणार आहे. मुंबई शहरातील परवडणारी घरे आणि ड्राफ्ट डीपी हे कसे इन्टरकनेक्टेड आहे याबद्दल सांगणार आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर म्हणुन प्रसिद्ध आहे. पण मुंबई शहरातील ओपन स्पेस रेशीओ फक्त १.२ पर स्क्वे.मी. पर पर्सन आहे. लंडनचा ओपन स्पेस रेशीओ फक्त ३१.२ पर स्क्वे.मी. पर पर्सन आहे. न्यूयोर्कचा ओपन स्पेस रेशीओ फक्त २५.२ पर स्क्वे.मी. पर पर्सन
आहे. शिकागोचा ओपन स्पेस रेशीओ फक्त १७.५ पर स्क्वे.मी. पर पर्सन आहे. यांच्या तुलनेत मुंबई शहराचा ओपन स्पेस रेशीओ फक्त १.२ पर स्क्वे.मी. पर पर्सन आहे. प्रस्तावीत डीपी मध्ये मुंबई शहराचा ओपन स्पेस रेशीओ फक्त १.८ पर स्क्वे.मी. पर पर्सन करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे म्हटले आहे. मुंबई शहरात म्हाडाच्या अनेक प्रकारचे आऊट आरजी आणि पीजी आहेत. पण ते डॉक्युमेन्टेड नाहीत. यामध्ये कोठे तरी मेन्युप्युलेशनच्या स्कोप ठेवलेला आहे. त्यामुळे मुंबई शहरातील म्हाडाच्या आरजी आणि पीजींचे डॉक्युमेन्ट होऊन इन्व्हेन्टरी बनल्यानंतर किंवा रेकॉर्ड झाले तर मुंबई शहरातील ओपन स्पेस हा डबल होऊ शकतो. मुंबई
शहरात ५०० कि.मी. च्या नद्या आहेत. वॉटर बॉडीज आणि वेटलॅन्ड आहेत. ब्रीमस्टोवॅडच्या २००५ च्या गाईड लाइन्सप्रमाणे सर्व नद्या वॉटर बॉडीज आणि वेटलॅन्डचा आजुबाजुचा ६ मीटरचा परिसर हा बफर झोन म्हणुन ओळखला जातो. जर प्रस्तावित डीपीमध्ये ओपन स्पेस म्हणुन रिझर्व्ह केले तर मुंबई शहराचा ओपन स्पेसचा रेशीओ हा ट्रीपल होणार आहे. प्रस्तावित डीपीमध्ये मुंबई शहराचा ओपन स्पेस रेशीओ फक्त १.८ पर स्क्वे.मी. पर पर्सन करण्याचा उल्लेख केलेला आहे. तो आपण ५.६ पर स्क्वे.मी. पर पर्सनवर आपण नेऊ शकतो.

मुंबई शहरात परवडणाऱ्या घरांसाठी जे.एन.एन.यु.आर.एम. योजनेतंर्गत ड्रेकोनियनचा नियम लावलेला आहे. या मुंबई शहरात म्हाडाचे जवळपास १०४ ले-आऊट आहेत. २३०० हेक्टर्स जमीन म्हाडाची आहे. या जमीनीचा विकास केला तर जवळपास पाच ते सहा लाख परवडणारी घरे ब्रांधलनी जाऊ शकतात. मुंबई शहरात २००० हेक्‍टर्सवर झोपडपट्टी वसलेली आहे. ही जागा डेव्हलप प्लॅनमध्ये झोपडपट्टी म्हणुन दाखविण्यात आलेली असुन या जागेवर कसलेही आरक्षण दाखविलेले नाही. या जागेवर परवडणारी घरे बांधली तर इ.डब्ल्यू एस.,
एम.आय.जी. आणि एल.आय.जी.ची मिळून जवळपास १० ते १२ लाख घरे निर्माण होऊ शकतात. आपल्या सरकारचे उद्दीष्ट ११ लाख परवडणारी घरे निर्माण करायची आहेत. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या जागेवर अतिरिक्‍त चार लाख घरे अशी मिळुन जवळपास १५ ते १६ लाख घरे आपण निर्माण करु शकतो. माझा अंधेरी (पश्‍चिम) मतदारसंघ आहे. अंधेरी स्टेशनच्या बाजूला ८ चा एफ.एस.आय. दिलेला आहे. यामध्ये पार्किंगचा समावेश केलेला आहे.

अंधेरी स्टेशनजवळील वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी मी अंधेरी प्रिसीट प्लॅनसाठी काम करीत आहे. अशा स्थितीत वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आपल्याला अशाप्रकारचा प्लॅन तयार करावा लागतो. त्या परिसरात उद्या ८ चा एफ.एस.आय. दिला तर त्या विभागाची काय परिस्थिति होईल.

अध्यक्ष महोदय, मॅन्ग्रोव्हज जमिनीवर ३७ हाऊर्सीग सोसायट्या दाखविण्यात आलेल्या आहेत. अनेक हाऊसींग सोसायट्यांमधुन रस्ता दाखविण्यात आलेला आहे. जुह्‌ बीच येथे साडेतीनचा एफ.एस.आय. दाखविलेला आहे. जुहू बीचवर साडेतीनचा एफ.एस.आय. कसा दाखविला जाऊ शकतो? यात काही त्रुटी चुकून झालेल्या आहेत तर काही मुद्दामहून निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील जनतेच्या मनामध्ये डेव्हलपमेन्ट प्लॅनबद्दल एक संशयाचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अनेक प्रकारचे राजकारण डेव्लपमेन्ट
प्लॅनवर होत आहे. जो ड्राफ्ट डी.पी. तयार करण्यात आला तो फक्त मॅथेमेटीकल व्हिजन डोक्यामध्ये ठेवुन तयार करण्यात आला. त्याला एक सोश्यल व्हिजन देण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरातील आर्किटेक्ट, अर्बन प्लॅनर्स, पर्यावरण तज्ज्ञ, सोशियालॉजीस्ट, एक्स्पर्टस या सर्वांना एकत्रित आणुन मुख्यमंत्री महोदयांनी एक कमिटी स्थापन करावी. त्या कमिटीच्या माध्यमातुन यावर चर्चा व्हावी. मुंबई शहराच्या सर्व समावेशक विकासासाठी या कमिटीच्या माध्यमातुन चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन मुंबई
शहरातील जनतेमधील संभ्रमाची अवस्था दूर होईल. मुंबई शहरातील पुढील ५० वर्षाचा डीपी तयार करण्यात यावा. माझी, मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे कि, मुंबई शहराच्या डेव्हलपमेन्ट प्लॅनसंदर्भात एक कमिटी स्थापन करण्याची घोषणा करुन मुंबईच्या जनतेतील संभ्रमाची अवस्था दूर करावी. मुंबई शहरात कोस्टल रोड मेट्रो - ३ प्रकल्प यांची कामे सुरु करुन मुंबई शहराला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा संभ्रमा अवस्थेतुन बाहेर काढुन मुंबई शहरातील जनतेला दिशा देण्याचे काम करावे, अशी माझी सुचना आहे. अध्यक्ष महोदय,
आपण मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. एवढे बोलुन मी माझे दोन शब्द पुरे करतो.
No comments:

Post a Comment