Monday, June 17, 2019

BJP MLA Ameet Satam present his point-of-view on Indian Education System in his book 'Rokthok'


On 2nd June 2019, BJP MLA of Andheri west Ameet Satam launched his book, ‘Rokhthok’ a compilation of speeches made by him in Legislative Assembly of Maharashtra. The book was inaugurated by Honorable CM of Maharashtra Devendra Fadnavis in the presence of Ashish Shelar, Gajanan Kirtikar, and all the fellow party mates. In the launch event, Ameet Satam clarified his purpose behind writing this book, that was to show his people that the person they have elected is raising their issues and concerns in front of higher authorities. Let's have a look at the first speech of that book.



प्रथम हिवाळी अधिवेशन, नागपुर
विषय : नियम २९३ अन्वये शिक्षणाच्या प्रस्तावावर बोलत असताना मला फक्त
माननीय शिक्षणमंत्र्यांना चार सूचना करावयाच्या आहेत

शिक्षणाचा प्रस्ताव (आध्यात्मिक शिक्षण)
श्री अमीत साटम,

अध्यक्ष महोदय, नियम २९३ अन्वये शिक्षणाच्या प्रस्तावावर बोलत असताना मला फक्त माननीय शिक्षणमंत्र्यांना चार सूचना करावयाच्या आहेत. कोणतेही राष्ट्र असो, राज्य असो, संस्था असोत. कोणत्याही प्रकारच्या संस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचे असेटस्‌ मनुष्यबळ असते. आपली पुर्ण शिक्षणाची सिस्टीम ही मनुष्यबळ संसाधनावर अवलंबुन आहे. गेल्या काही वर्षापासुन मला या शिक्षण धोरणाच्या बाबतीत प्रामुख्याने तीन गोष्टींचा अभाव दिसुन येत
आहे. पहिला म्हणजे शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. दुसरी बाब म्हणजे शिक्षणाची वाढती किंमत या गोष्टीमुळे आपला महाराष्ट्राचा लिटरेसी रेट हा बाराव्या क्रमांकावर आहे.

अध्यक्ष महोदय, संपूर्ण देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीत आपल्या राज्याचा बारावा क्रमांक लागतो. Literacy Qualified आणि Educated शिक्षणाच्या बाबतीत या तीन वेगवेगळ्या गोष्टी असतात. आजची शिक्षण प्रणाली आपल्याला Literate करते. ती आपल्याला Qualified करते. पण ती आपल्याला Educated करते काय ? Education हा शब्द Educe नावाच्या लॅटीन भाषेतुन आलेला आहे. याचा अर्थ असा होता की, To come from within म्हणजे आतून आपली डेव्हलपमेन्ट होणे ही बाब महत्त्वाची आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ही गोष्ट कोठेतरी कमी पडत असल्याचे जाणवत आहे. मोठमोठ्या कंपन्यामध्ये सुद्धा I.Q.; S.Q. आणि आता एक नवीन बाब आली आहे. S.Q. म्हणजे Spiritual Quotient अशा प्रकारच्या उमेदवारांची आवश्यकता असते.

अध्यक्ष महोदय, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी दिनांक २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ““योगदिन”* म्हणून साजरा करावा अशी सुचना केली होती. सदरहू सुचना संयुक्‍त राष्ट्र संघाने स्वीकारलेली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमात “'योग** हा विषय इन्ट्रोड्युस करण्यात यावा आणि तो कम्पलसरी ठेवण्यात यावा अशी माझी विनंती आहे. या शिक्षण प्रस्तावात असे म्हटले आहे की नेतृत्व गुण विकास करण्यासाठी विद्यापीठाच्या निवडणुका आपण घेत आहात. या निवडणुका आपण सुरू करणार आहात, ही बाब स्वीकारार्ह आहे, पण अशा प्रकारच्या निवडणुका होत असताना त्या नियंत्रित वातावरणामध्ये व्हाव्यात, याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. या निवडणुकांमध्ये 'भाग घेणारे जे विद्यार्थी असतील त्यांना पब्लिक पॉलिसीचा करीक्युलम सुद्धा कम्पलसरी ठेवण्यात यावा अशी माझी शिक्षणमंत्र्यांना विनंती आहे. परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली होती की, औरंगाबाद येथे स्कूल ऑफ प्लॅनींग आणि आर्किटेक्चर सुरु करण्यात येणार आहे. माझी आपल्या मार्फत माननीय शिक्षणमंत्र्यांना विनंती आहे की, ज्याप्रमाणे आपण स्कूल ऑफ प्लॅनींग आणि ऑर्किटेक्चर सुरु करणार आहोत त्याचप्रकारे महाराष्ट्र शासनाचे स्कूल ऑफ गव्हर्नमेन्ट हे महाराष्ट्रामध्ये सुरु करण्यात यावे. जेणे करुन विद्यापीठांच्या निवडणुकानंतर ज्या तरुणांना राजकारणामध्ये येण्याचा रस आहे. त्यांना त्याचा उपयोग होईल. अशा प्रकारची प्रशिक्षण संस्था आपण सुरु करावी. मला असे वाटते की, शिक्षण या पुर्ण व्यवस्थेचा पाया शिक्षक असतो. म्हणुन शिक्षकांचे प्रशिक्षण हे आवश्यक असते. या शिक्षकांना प्रशिक्षण देतांना शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर आधारित पदोन्नतीची पॉलिसी आणावी. अशी माझी
माननीय शिक्षणमंत्र्यांना विनंती आहे. केन्द्र सरकारने ज्याप्रमाणे स्कील्ड डेव्हलपमेन्ट साठी एक वेगळी मिनिस्ट्री तयार केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व तरुणांच्या विकासासाठी त्या तरुणामध्ये असलेले हुन्नर बाहेर यावेत, एक चांगला इन्डस्ट्री वर्क फोर्स तयार व्हावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हानिहाय स्कील्ड डेव्हलपमेन्ट सेन्टर सुरु करावे, अशी माझी मागणी आहे. जेणेकरुन आपल्या या तरुणांना या इन्डस्ट्रीजमध्ये कशा प्रकारच्या हुन्नर तरुणांची आवश्यकता आहे, तशा प्रकारे त्या तरुणांना प्रशिक्षण देता येईल आणि रोजगार निर्मिती
करता येईल. अशा प्रकारे सर्व समावेशक, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि अध्यात्मिक विकासातुन वर्क फोर्स निर्माण करुन आपण एका प्रगतिशील महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करु, असा माझा विश्वास आहे. अध्यक्ष महाराज, आपण मला बोलण्याची जी संधी दिली, त्याबद्ल मी आपला आभारी आहे. एवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवितो.. 

Discover latest Indian Blogs Blogs Directory