Wednesday, July 3, 2019

BJP MLA Ameet Satam present some ideas about Tourism

BJP MLA Ameet Satam recently published his book 'Rokhthok' in which he published all the speeches he gave in the legislative assembly of Maharashtra. In one of his speeches, he presented some ideas to improve tourism in Mumbai and Konkan.विषय : मुंबई पर्यटन, कोकण पर्यटन आणि बॉलीवुड म्युझीयम
पर्यटन व कोकण
श्री. अमीत साटम

अध्यक्ष महोदय, वि.स. स. नियम २९३ च्या प्रस्तावावर बोलत असताना गेल्या ४
दिवसापासुन हा प्रस्ताव कार्यक्रमपत्रिकेमध्ये दाखविण्यात येत आहे. सन्माननीय सदस्य श्री.
राज पुरोहित म्हणाले की, गेल्या २ ते २.५ वर्षापासुन हा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न करीत
आहोत म्हणजेच २ ते २.५ वर्षानंतर हा प्रस्ताव आलेला आहे. या गोष्टीवरुन पर्यटन क्षेत्राप्रती
कशी उदासिनता आहे हे दिसुन येते. देशाच्या जी.डी.पी. मध्ये ९.६ टक्के कॉन्ट्रीब्युशन हे
पर्यटन क्षेत्राचे आहे. देशामध्ये जेवढे रोजगार आहेत त्याच्या १० टक्के रोजगार हा पर्यटन
क्षेत्रामध्ये निर्माण होतो. सन २०२५ पर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी १ ट्रीलीयन डॉलर झाली
पाहिजे, असे माननीय मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. महाराष्ट्राला जर १ हजार डॉलर पर्यंत
इकॉनॉमी करायची असेल तर पर्यटन क्षेत्रावर जास्तीत जास्त भर देण्याची आवश्यकता आहे.
कारण पर्यटन, उद्योग आणि शेती हे तीन सेक्टर असे आहेत की ज्या सेक्टरवर भर दिल्यावर
जी.डी.पी. वाढेल. शेती क्षेत्रावर जलयुक्त शिवार योजनेसारखे अनेक प्रकल्प राबवुन भर दिला
जात आहे. उद्योग क्षेत्रामध्ये आता मॅग्नेटीक महाराष्ट्र पार पाडलेला आहे. पण पर्यटनाच्या
दृष्टीकोनातुन अजुन पर्यंत कोणतेही ठोस पाऊल घेतलेले दिसुन येत नाही. त्यामुळे आपला
महाराष्ट्र म्हणजे गडकिल्यांचा महाराष्ट्र, लेण्यांचा महाराष्ट्र, समुद्रकिनाऱ्यांचा महाराष्ट्र तसेच
अभयारण्यांचा महाराष्ट्र आहे. देशामध्ये विदेशी पर्यटकांच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या
क्रमांकांवर आहे. देशी पर्यटकांच्या संख्येच्या प्रमाणात चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गडकिल्ले, अभयारण्य किंवा हिल स्टेशन असुनही महाराष्ट्र चौथ्या
क्रमांकावर आहे याचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहराकडे बघितले तर मुंबईला
'पूर्वेकडचे न्यूयॉर्क लॉस एंजिलिस' म्हणतात. पण न्यूयॉर्क आणि लॉस एंजिलिस दूरच ठेवले
तर आपण साऊथ ईस्ट एशिया म्हणजे सिंगापुर, हाँगकांग, थायलंड आणि मलेशियाच्या
टुरिजम आणि शहरांकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की या देशातील टुरिजम हे मॅनमेड
टुरिजम आहे. मॅनमेड टुरिजम म्हणजे ते नैसर्गिक नाही. पण स्विर्त्झलेंड, काश्मिर किंवा युरोप
येथील टुरिजम हे नैसर्गिक आहे. मॅनमेड टुरिजम सिंगापुर शहरात सेंटोसा हे सरकारने विकसित
केले आहे. तिथे युनिव्हर्सल स्टुडिओ सरकाने बांधलेले आहे. तसेच दुबई मॉलमधील फाऊंटन
शो हा तेथील सरकारने किंवा तेथील कोर्पोरेशनने निर्माण केला आहे. क्वालालंपुर येथील
टीन टॉवर तेथील कोणत्या तरी डेव्हलपरने उभारले आहेत. हाँगकाँग येथे जायचे म्हणजे
सिंफोनी ऑफ लाईटस्‌ हे विशेष आहेत. सिंफोनी ऑफ लाईटस्‌ म्हणजे काय तर एका समुद्र
किनाऱ्यावर असलेल्या सर्व इमारतीचे लाईट हे म्युजिक प्रमाण पेटतात. जगभरातील पर्यटक
तिथे सिंफोनी ऑफ लाईटस्‌ बघायला येतात. यापेक्षा चांगले सिंफोनी ऑफ लाईटस्‌ बघायचे
असतील तर सन्माननीय सदस्य अँड. आशिष शेलार यांनी त्यांच्या मतदारसंघात डी.पी.डी.
सी. मधुन एक प्रपोजल टाकले आहे. बांद्रे रिकलमेशनला लेझर आणि साऊँड शो करण्याचे
आहे. हे जर तयार झाले तर हॉँगकांगच्या सिंफोनी ऑफ लाईटस्‌ला मागे सोडण्याची ताकद
त्याच्यामध्ये आहे. परंतु आपल्या पर्यटन विभागामार्फत त्याचे मार्केटींग जगभरामध्ये केले
पाहिजे. पण आपण या मार्केरटींगमध्ये कुठे तरी कमी पडत आहोत. सिंगापुरमध्ये आयलंडनमध्ये
लंडन आय म्हणजे ते काय आहे तर एक जायंट व्हील आहे म्हणजे ते जायंट व्हील उंचावर
फिरत असते आणि लोक त्याच्यावर बसतात व पुर्ण शहर बघतात. हे मुंबईमध्ये होऊ शकत
नाही काय? आतापार्यंत दोन वेळा प्रस्ताव आला होता. त्यातील गोराई येथील एका माणसाने
प्रस्ताव दिला होता की मी माझ्या जागेवर मुंबई आय प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये बनवतो.
दुसरा प्रस्ताव असा होता की, वरळी येथील डेअरीमध्ये शासनाच्या जमिनीवर मुंबई आय
हे शासनामार्फत तयार करायचे. माझी माननीय मंत्र्यांना विनंती आहे की आपण या दोन्ही
प्रस्तावांची व्हायबिलीटी आणि फिजीबिलीटी चेक करुन त्याच्यामध्ये जे फिजीबल असेल
त्याची फायनानशियल फिजीबिलीटी, टेक्निकल फिजीबिलीटी हे सर्व चेक करुन आपण

लवकरात लवकर मुंबई आयचा प्रस्ताव आणुन ते पुर्ण करावे. अशाप्रकारची मी मागणी करतो.
अध्यक्ष महोदय, जुह्चा समुद्रकिनारा तसेच माझ्या मतदारसंघातील गिलबर्ट
हिल मुंबई शहरात आहेत. जगामध्ये असे दोनच डोंगर आहेत की जे नेचरल वॉलकनीक
इरप्शनमधुन निर्माण झालेले आहेत. त्यातील एक अमेरीकेतील आहे आणि दुसरा गिलबर्ट
हिल आहे. आतापर्यंत दुलर्क्षित असा गिलबर्ट हिल होता. तर या गिलबर्ट हिलसाठी या
शासनाने १० कोटी रुपये मान्य करुन ५ कोटी रुपयांची वर्कऑर्डर दिली या बद्दल माननीय
मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री श्री. विनोद तावडे यांचे मी अभिनंदन करतो. ते काम
सुरु झाले आहे आणि आता तिथे गिलबर्ट हिलच्या कॉन्झरवेशनचा प्लॅन राबविण्यात
येत आहे. त्यामुळे मी शासनाला धन्यवाद देतो. मुंबई आय किंवा सिंफोनी ऑफ लाईडस्‌
मुंबई शहरामध्ये निर्माण करता येते. दुबई मॉलमध्ये तेथील फाऊंटन शो बघण्यासाठी रोज
संध्याकाळी ७.0० वाजता ट्धुरिस्ट जातात. हा फाऊंटन शो सुरु होणार म्हणुन दुबईमध्ये
कुठेही माणुस असला किंवा फिरायला गेला असेल तर संध्याकाळी ७.०० वाजता त्या
दुबई मॉलमध्ये बुर्ज खलिफाच्या खाली फाउंटन शो बघायला येतो. काही लोक वरती बुर्ज
खलिफामध्ये जाऊन वरच्या ऑब्जरवेटरी टॉवर मधुन संध्याकाळी ७.०० वाजता तो फाउंटन
शो बघतात. संध्याकाळी ७.00 वाजता दुबई मॉल व हा फाउंटन शो फेमस आहे. मुंबई
शहरामध्ये पवई लेक, बांद्रे येथील स्वामी विवेकानंद सरोवर या दोन लेक मध्ये किंवा
अशा इतर कितीतरी वॉटर बॉडीज आहेत तिथे दुबई मॉलपेक्षाही चांगला फाउंटन शो आपण
एम.टी.डी.सी.च्या मार्फत, पर्यटन विभागाच्या मार्फत करु शकतो. यासाठी जास्त काही खर्च
येत नाही तर ५० कोटी रुपयांच्या आतमध्येच येतो. पर्यटन विभागाचे बजेट हे २०१ कोटी
रुपये एवढे एका वर्षाला असु शकते असे मला वाटते. त्यामुळे आपण ५ वर्षांमध्ये सिगांपुर,
मलेशिया, हाँगकाँग, दुबई या सर्वांना विसरेल असे प्रकल्प आपण करु शकतो.

आपण जगाच्या पाठीवर कोठेही गेल्यानंतर मुंबई... बॉलिवुड अशाप्रकारे एक समोरुन
रिअँक्शन येते.

अध्यक्ष महोदय, लॉस अँजलीसमध्ये हॉलिवुड आहे. हॉलिवुडमध्ये काहीच नाही.
हॉलिवुड म्हणजे एका डोंगरावर HOLLYWOOD अशा अक्षरांनी लिहिलेली एक पाटी आहे.
तसेच त्याठिकाणी एक थिएटर आहे. या थिएटरमध्ये ऑस्कर अँवॉर्ड दिले जातात. बस एवढेच
बाकी काही नाही. हॉलिवुड म्हणजे याशिवाय दुसरे काही नाही. जगातील सर्व नामांकित
कलाकार हे लॉस अँजलीसमध्ये बेव्हरली हिल्स येथे राहतात. बस एवढेच बाकी काही नाही.
ब्रॉलिवुड खुप मोठे आहे. आपल्या सर्व नट-नट्यांचे fan-following आपण चेक केल्यानंतर
हॉलिवुडमधील प्रत्येक नटाला लाजवेल अशी परिस्थिती आहे.
अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील जुहू हे आपल्या येथील बेव्हरली हिल्स
आहे. लॉस ऑअँजलीसमध्ये जसे बेव्हरली हिल्स आहे, तसे माझ्या जुहूमध्ये बेव्हरली हिल्स
आहे. फ्रान्समध्ये लुई नावाचा कॉमेडीयन कलाकार सुपरस्टार होता. लुई नावाच्या कॉमेडियन
कलाकाराच्या नावाने एक म्युझियम तयार करण्यात आले. याच धर्तीवर हिंदी सिनेसृष्टीतील
सुपरस्टार श्री. अमिताभ बच्चन म्हणजे बीग-बी यांच्या नावाने जुहूमध्ये एक म्युझियम तयार
करण्यात यावे अशी माझी पर्यटन मंत्री महोदयांना विनंती आहे. श्री. अमिताभ बच्चन बीग-
बरी यांचे जुहूमध्ये म्युझियम तयार केले तर जगातील अनेक पर्यटक म्युझियम बघण्यासाठी
तेथे येऊ शकतील. याच धर्तीवर आपल्याला बॉलिवुड म्युझियम तयार करता येणार आहे.
ग्रॉलिवुडची ख्याती जगात आहे. आपण अशाप्रकारचे म्युझियम तयार करु शकतो.

अध्यक्ष महोदय, मुंबईच्या शहरातील एक विषयाकडे माननीय पर्यटनमंत्री महोदयांचे लक्ष
वेधणार आहे. माझ्या मतदारसंघात वर्सोवा बरिच असुन, तेथे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्यावतीने
एक मनोरंजन झोन करण्याबाबतचा प्रस्ताव मी शासनाकडे दिलेला आहे. सदरहू विषय
जरी पर्यटन विभागाशी निगडित नसला तरी तो विषय पोर्टच्या अंतर्गत येत आहे. माननीय
पर्यटनमंत्री महोदयांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत वर्सोवा बिच
येथे मनोरंजन झोन करण्याबाबतचा पाठपुरावा करावा अशी माझी विनंती आहे. आपण जसे
मायामी ऐकतो तसे आता मायामी नाही तर मुंबई शहरामध्ये मायामी तयार करु शकतो आणि
ते जगाला दाखविण्यासाठी माननीय पर्यटनमंत्री महोदयांनी अशाप्रकारचा संकल्प करण्याची
गरज आहे.

अध्यक्ष महोदय, मुंबई शहरात धार्मिक स्थळे खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबई

शहरात सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी, हाजीअली, माऊंटमेरी आणि पारसी अग्यारी
अशी मुंबई शहरात धार्मिक स्थळे आहेत. तसेच गेट वे ऑफ इंडिया देखील खुप सुंदर आहे.

गेट वे ऑफ इंडियाला एल.ई.डी. लायर्टींग केलेली आहे. याच धर्तीवर एल.ई.डी. लायर्टीग
करण्यासाठी पर्यटन विभागाने एका वर्षाचा फंड हा सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी,
हाजीअली, माऊंटमेरी आणि पारसी अग्यारी या सहा पर्यटन स्थळावर खर्च करावा आणि
MIDCच्या मार्फत तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशी माझी पर्यटनमंत्री
महोदयांना विनंती आहे. या माध्यमातुन ही स्थळे सुशोभित होणार आहेत. त्यामुळे जगातील
पर्यटक त्याठिकाणी आवर्जुन भेट देतील असे मला वाटते.

अध्यक्ष महोदय, मी मुंबई शहरातुन निवडुन आलेलो आहे. परंतु माझी नाळ आणि
मुळ ही कोकणात रुळलेली आहे. जर मी कोकणावर भाष्य केले नाही तर मी माझ्यावर आणि
कोकणातील तसेच मालवणी जनतेवर अन्याय केल्यासारखे होणार आहे.

*“कोकण हा सौंदर्याचा जणु खजिना हिरवाईचा नजराना
स्वर्गामधले नंदनवन हे अवतरले भू वरी
इतिहासाची साक्ष सांगती इथल्या सागर लहरी
ही भुमी नर रत्नांची, ही माती रसिक मनाची
गाथा ही थोर शिवबाची, करुणामय संतजणांची"'

अध्यक्ष महोदय, कोकणाची तुलना ही गोवा आणि केरळशी केली जाते. परंतु, मी
कोकणाची तुलना ही गोवा आणि केरळशी करणार नाही. त्यामागचे महत्वाचे कारण असे आहे
की, गोवा आणि केरळपेक्षा कोकण हे खुप जास्त सुंदर आणि नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांनी
नटलेले आहे. त्यामुळे कोकणाच्या टुरिझममध्ये अशी ताकद आहे की साऊथ इस्ट एशियाच्या
टुरिझमला खतम करण्याची ताकद ही एकट्या कोकणामध्ये आहे. पर्यटक पटाया, बँकॉक,
मलेशियामधील लंकावी किंवा इंडोनेशियामधील बाली किंवा बिंतान आयलँड अशा सर्व
आयलेंडला विसरुन जातील अशाप्रकारची क्षमता ही माझ्या कोकणच्या भुमीत आहे. परंतु तेथे
चांगल्या पायाभुत सोयीसुविधा तेथे जाण्यासाठी चांगली कनेक्टिव्हीटी नाही आणि कोकणाचे
चांगले मार्केटींग झालेले नाही. कोकणातील आमची माणसे ही साधीभोळी आहेत. आताच
सन्माननीय सदस्या श्रीमती मनिषा चौधरी यांनी त्यांच्या भाषणातुन कोकणचा शेतकरी कधीच

आत्महत्या करीत नाही असा उल्लेख केलेला आहे. कोकणी जनतेचा आवाज विधानसभेत
पोहचण्यासाठी कमी पडत आहे. अशाप्रकारचे मानणारा मालवणी... (अडथळा)... कोकणचा
आवाज बुलंद आहे तितका विकास झालेला दिसुन येत नाही. सन्माननीय सदस्य श्री धैर्यशील
पाटील हे माझ्या वक्तव्याशी सहमत असतील असे मला वाटते. कोकणामध्ये एअरपोर्ट नाही.
कोकण कनेक्टिव्हीटीमध्ये मागे राहण्याचे ते मुख्य कारण आहे. कोकणात रस्त्याने जायचे
म्हटले तर १० ते १२ तास लागतात. माननीय केंद्रीयमंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मुंबई-
गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन करतो.
हा राष्ट्रीय महामार्ग सन २०१९ पर्यंत पुर्ण होणार आहे. या राष्ट्रीय महामार्गामुळे आपल्याला
गोव्यात ८ तासात पोहचणे शक्‍य होणार आहे. अशाप्रकारची कनेक्टिव्हीटी वाढविणे ही
काळाची गरज आहे. चिपी येथे एअरपोर्ट होत आहे. कोकणाचा विकास हा एकट्या पर्यटन
खात्याशी संबंधित नसुन त्याचा संबंध सार्वजनिक बांधकाम विभाग, स्कील्ड डेव्हलपमेंट
विभागाशी देखील संबंधित आहे. त्याठिकाणी सी-वर्ल्डचा प्रकल्प आहे. गेल्या १० ते १२
वर्षापासुन सी-वर्ल्डचा प्रकल्प करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली काय असा
माझा पर्यटनमंत्री महोदयांना प्रश्न आहे. मंत्री महोदय म्हणत आहे की, तो प्रकल्प पुर्ण होऊ
शकत नाही. तेथील स्थानिक लोक या प्रकल्पासाठी जमीन देत नाहीत. त्यामुळे सी-
वर्ल्डच्या प्रकल्पामध्ये अनंत अडचणी आहेत. त्या ठिकाणी MIDCचा आणखी एक प्रकल्प होत
असुन, पर्यटनमंत्री महोदयांनी त्यासंदर्भात चाचपणी करण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी
मेट्रोचा एक प्रकल्प प्रस्तावित होता. चिपी एअरपोर्ट, कुणकेश्वरचे मंदिर, सी-वर्ल्डचा प्रकल्प,
तारकर्ली आणि सिंधुदुर्ग किल्ला अशा सहा ठिकाणांना जोडणारी मेट्रो रेल उभारण्याची गरज
आहे. जेणेकरुन एखादा पर्यटक एअरपोर्टवर उतरल्यानंतर या सहा टुरिस्ट स्पॉटला भेट देऊ
शकतो. यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. परंतु आजतागायत सदर प्रस्तावासंबंधी
कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परंतु अशाप्रकारची कनेक्टिव्हीटी कोकणामध्ये तयार केली
तर कोकणाचा विकास करण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी होणार आहोत.

अध्यक्ष महोदय, मी स्कील डेव्हलपमेन्ट संदर्भात बोलणार आहे. कनेक्टिव्हीटी
केल्यानंतर रस्ते केले जातील. तसेच आवश्यक त्या पायाभुत सोईसुविधा निर्माण केल्या
जातील. जोपर्यंत आपण कोकणातील तरुणाला स्कील्ड करीत नाही तोपर्यंत त्याला स्वत:चा
व्यवसाय करता येणार नाही किंवा त्याला नोकरी देखील मिळणार नाही. कोकणातील तरुणाला
प्रशिक्षित करण्याकरीता स्कील्ड डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. कोकणातील
पर्यटनाचा विकास करण्यापुर्वी इंडस्ट्रीजला देखील प्राधान्य द्यावे लागणार आहे. गेल्या वेळेस
मेक ईन इंडियामध्ये जैन इरिगेशन कंपनीचा ऑरेंज उन्नती नावाचा एक समंजस्य करार
झालेला आहे. ज्याप्रकारे ऑरेंज उन्नती संदर्भात एम.ओ.यू. झाला. तशाच प्रकारे कोकणात
मँगो उन्नती आणि काजु उन्नती अशाप्रकारचे प्रकल्प राबविण्यासाठी पर्यटनमंत्री महोदयांनी
उद्योग विभागासमवेत पाठपुरावा करावा अशी माझी विनंती आहे. परिणामी कोकणात उद्योग
येतील आणि उद्योग आल्यानंतर रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. सन २०२५
पर्यंत आपली अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर इतकी करण्याचे आपले स्वप्न आहे. यामध्ये
कोकणातील पर्यटनाचा खुप मोठ्या प्रमाणावर सहभाग होऊ शकतो.

अध्यक्ष महोदय, वेळ खुप कमी आहे. मला खुप काही बोलायचे होते परंतु मी शेवटी
जाता जाता आपल्या मार्फत आपल्या राज्याच्या माननीय पर्यटनमंत्र्यांना माझ्या कोकणच्या
जनतेच्यावतीने, मी माझ्या मालवणी जनतेच्यावतीने, मालवणीत जसे म्हणतात तसे बेंबीच्या
देठापासून आपणाला सांगु इच्छितो की, कोकणचा माणुस हातामध्ये ताट घेऊन निरंजन
लावुन उभा आहे. ओवाळायला तयार आहे. आपण ओवाळुन तरी घ्या. मी आपल्याला माझ्या
कोकणच्या जनतेच्या वतीने माझ्या खास मालवणी भाषेत एवढेच सांगतो की,

माझ्या कोकणात कधीपण येवूचा, खावूचा, पिवूचा, रहूचा मापत्याचो भात खावून
झाडाखाली रावूचा, पण दुनियेत माझ्या फिराक नाही तितका फिराक एकट्या माझ्या
कोकणात असा आणि मंत्री महोदय, मका काय ईचारतोस की, तुझ्या कोकणात काय
असा. अरे येवा कोकण आपलाच असा.

आपणास खूप खूप धन्यवाद. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो.

No comments:

Post a Comment